Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा(लाड ) येथे ६८ रक्तदात्यांनी केले रक्तदान



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि

कारंजा(लाड ) आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त व लोकमान्य व्यायाम शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आर्ट ऑफ लिविंग परिवार, लोकमान्य व्यायाम शाळा, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मे रोजी स्थानिक भरतीत स्टेट बँक येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ६८ जनांनी रक्तदान केले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यायामशाळेचे अध्यक्ष कुमारभाऊ घुडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव गोपाळराव वाघाडे, भारत गॅसचे संचालक शेखरभाऊ बंग, स्टेट बँकेचे मंदार काटे आर्ट ऑफ लिविंगचे सुधीरभाऊ चांडक, गाडगेबाबा रक्तपेढीचे अधिकारी डॉ. अनिल कवीमंडन उपस्थित होते. प्रारंभी श्रीश्री गुरुदेव रवीशंकरजी यांच्या प्रतिमेला हरार्पण करण्यात आले. प्रास्ताविक डॉक्टर सुशील देशपांडे यांनी केले. ते म्हणाले की गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने गुरुजींच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेतल्या जाते. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. तसेच कारंजातील लोकमान्य व्यायाम शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली.

 ही बाब कारंजासाठीभूषणावह आहे. तर मंदार काटे व डॉ. अनिल कवीमंडन यांनी कारंजातील होत असलेल्या विधायक उपक्रमाचे व कारंजातील लोकांच्या सेवाभावी वृत्तीचे भरभरून कौतुक केले. भारत गॅसचे शेखर बंग म्हणाले की, लोकमान्य व्यायाम शाळेच्या चार पिढ्याच्या अथक परिश्रमाने या व्यायाम शाळेने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. यावेळी कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये बीएसएफ चे जवान अतुल कुर्हेकर हे सुट्टीवर आले आहेत. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवरतणावाचे वातावरण असल्याने त्यांना तातडीने सेवा रुजू होण्याचा आदेश आला आहे असे असतानाही त्यांनी सुद्धा रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले, आणि एक आदर्श निर्माण केला, त्यामुळे आमदार डहाके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात एकूण ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ६५ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील चवरे यांचे रक्तदान, आपल्या सहा रक्तदात्यांसह रुपेश बाहेती यांनी केलेले रक्तदान आपल्या स्टाफ सह स्वतः डॉक्टर शार्दुल डोणगावकर यांनी केलेले रक्तदान, सौरभ गुगलिया यांचेकडे पाहुण्या म्हणून आलेल्या तीन महिलांनी स्वयंस्फूर्तीने केलेले रक्तदान, एकूण सहा महिलांनी केलेले रक्तदान हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार आनंद पेंटे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य व्यायाम शाळा व आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले