Ticker

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुगणाल.कारंजा लाड येथे सुरक्षा रक्षकाचा मृत्यू



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड़ ) येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. ही घटना १८ मी रोजी सायंकाळी ७वाजताच्या सुमारास घडली. महेश चंद्रकांत विभूते (४०, रा. वाणीपुरा ह. मु. महसूल कॉलनी) असे मृतकाचे नाव आहे. विभूते हे येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रविवारी ते उपजिल्हा रुग्णालयपरिसरात पायदळ व्यायाम करत होते.

वॉकिंग करत असताना ते अचानक खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपघात कक्षात दाखल केले. परंतु, येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी राजेश चंद्रकांत विभूते यांच्या फिर्यादीवरुण आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. दरम्यान, विभूते यांच्या निधनाने रुग्णालय, मित्र परिवार तथा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे