Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र दिनानिमित्त मलकापूर येथे महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड संपन्न



महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापूर 

मलकापुर :- महाराष्ट्र ग्रामीण न्युज व हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील  कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होतेत्यावेळी  356 प्रस्तावांपैकी निवड करून 60  मान्यवरांना महाराष्ट्र एक्सलन्स पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. 

महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे सहा माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई, होते तर प्रमुख पाहुणे भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ, धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ,  प्रसाद भाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा ऊपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, बंडूभाऊ चवरे काँग्रेस नेते, फारुख शेख ज्येष्ठ पत्रकार लोकमत, दामोदर शर्मा शेतकरी नेते, वीरसिंहदादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार होते.कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड 2025 देऊन करण्यात आला. 



या कार्यक्रमाप्रसंगी पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.महिलांसाठी मानाचे असे समजले जाणारे गृहरक्षक दलामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला होमगार्ड भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. 

      सदर कार्यक्रमाला पत्रकार अजय टप,सतीश दांडगे , नथुजी हिवराळे,संदीप सावजी, प्रकाश थाटे, राजेश इंगळे, विनायक तळेकर,समाधान सुरवाडे, स्वप्निल आकोटकर, धीरज वैष्णव, कैलास  काळे, अनिल गोठी, मयूर लड्डा,  निलेश चोपडे, प्रमोद हिवराळे , यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सुरवाडे सर यांनी  तर आभार प्रदर्शन प्रदीप इंगळे यांनी केले


 किरण सूर्यवंशी कृषी, सुरेश उत्तपुरे शिक्षण, प्रशांत कर्ह कला, महादेव बावरे शिक्षण, रुपेश अवचार सामाजिक, निळकंठ पाटील सामाजिक, गजानन चेक सामाजिक, बालाजी कांबळे सामाजिक, पूर्णाजी खोडके सामाजिक, जनार्दन काळे सामाजिक, सुकनंदन हांडे सामाजिक, शिल्पा देशमुख राजकीय, सारंग माळेकर राजकीय, अनिल दाहेलकर पत्रकार, मोहम्मद फारुख अब्दुल गफार, तमेशस्वर पांढरे पत्रकार, भीमकिरण दामोदर पत्रकार, गोपाळ कळस्कर पत्रकार, संजय भरडूक पत्रकार मिलिंद इंगळे पत्रकार, बाळू मुंगळे पत्रकार, ॲड मोहन शुक्ला विधी, शाहीर भीमराव अंभोरे कला, डॉ मनोहर शेगोकार वैद्यकीय, प्रेमदास वाकोडे वैद्यकीय, शारदा अंभोरे महिला व बालकल्याण,  पूजा रडके उद्योजक, राजेश घुगे  ॲड भारती कुमावत बाल लैंगिकता लेखिका, डॉ. नयन महाजन विधी प्राचार्य, शरद तेलंग आरोग्य विभाग, गजानन नाकाडे उद्योजक विभाग