Ticker

6/recent/ticker-posts

दिगंबर जैन साधूंच्या फोटोची मौफिंग करून अपमान मालेगाव सकल दिगंबर जैन समाजाची पोलीसांकडे कठोर कारवाईची मागणी...



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव : श्री. वृषभनाथ दिगंबर जैन मंदिर,मालेगाव येथे सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहत मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनात समाजाच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आली की,ज्ञानेश्वर भगाजी गाढे यांनी एका दिगंबर जैन साधूंच्या फोटोमध्ये मोर्फिंग करून त्या प्रतिमेचा अवमानकारक व आक्षेपार्ह स्वरूपात वापर केला सदर फोटो आणि त्यासोबतची अवमानकार पोस्ट आरोपीने स्वतःच्या फेसबुक प्रोफाइलवर प्रसारित केली 

या प्रकारामुळे संपूर्ण जैन समाजाच्या भावना दुखावल्या असून,साधूंच्या प्रतिमेचा अपमान झाला आहे ही कृती समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी असून,भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा ठरतो त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तक्रारदार म्हणून सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य सकल दिगंबर जैन समाज यांनी निवेदन सादर केले. यावेळी सकल दिगंबर जैन समाजबांधव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात उपस्थित होते.