Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर महाविद्यालयचा कॅडेट एनसीसी च्या राष्ट्रीय शिबीरसाठी निवड



देगलूर - प्रतिनिधी- जावेद अहेमद

अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट गवळी रोहन याची जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झालेली आहे.

या निवडीबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष विलास तोटावार,कार्यकारिणी मंडळाचे सदस्य विजय उनग्रतवार, रवींद्र अप्पा द्याडे,प्राचार्य डॉ.मोहन खताळ उप प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार उप प्राचार्य डॉ.चमकूडे एम एम,उप प्राचार्य डॉ.शेरीकर व्ही जी यांनी कॅडेटचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ. निरज उपलंचवार यांची उपस्थिती होती. जम्मू आणि काश्मीर येथील राष्ट्रीय शिबिराचा कालावधी १७ मे ते २७ मे आहे. या ट्रेकिंग कॅम्पचा उद्देश कॅडेट्समध्ये आत्मविश्वास जागृत करणे आणि त्यांना विविध वातावरणातील आव्हानांशी मुकाबला देण्यासाठी तयार करणे, हा आहे. एनसीसी ट्रेकिंगमध्ये पॅरासेलिंग, पर्वत चढणे, वेगवेगळ्या प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धा तसेच अनेक उपक्रमांचे आयोजन असतो.

या निवडीबद्दलया अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे,सूर्यकांत नारलावार,गंगाधरराव जोशी, चंद्रकांत नारलावार,गुरुराज चिद्रावार, सुभाषराव सांगवीकर, यांच्यासह पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील,कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.