पालघर दि.23 मे (ज्ञानेश चौधरी)
पालघर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ ह्या मुळे समुद्र किनार पट्टी आणि आजुबाजूच्या गावात गारपीट सदृश पाऊस आणि जोराचा वारा ह्या मुळे बरेच लोकांच्या डोक्यावरील छप्पर उडून गेले आहे. आणि लोकांचे नुकसान झाले आहे.
वादळी वारा असल्यामुळे बरीच झाले मोडून पडली आहे. महावितरण ने खबरदारी म्हणून वीज पुरवठा बंद केला आहे. शुक्रवार असल्याने दुरुस्ती साठी सकाळीच वीज पुरवठा बंद केला गेला होता आणि त्यातच ३ ते साडे तीन वाजता पाऊस आणि वारा सुटल्या मुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाऊस आणि वारा कमी व्हायची वाट पाहावी लागणार आहे
स्थानिक प्रशासनाने लोकांच्या घराची पाहणी करून आपत्कालीन मदत करावी अशी जन सामन्याची मागणी आहे





Social Plugin