बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील बुध गावचे सुपुत्र अजय वनिता तानाजी सूर्यवंशी याची केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा 02/2024 परीक्षेत देशात 172 रँक मिळवून इंडियन आर्मी साठी ऑफिसर पदासाठी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
अजयचे वडील श्री.तानाजी नारायण सूर्यवंशी हे भारतीय नौदलात सेवा देऊन सन 2009 मध्ये निवृत्त होऊन सध्या कृषी आयुक्तालय पुणे येथे कार्यरत आहेत अजयला लहानपणापासूनच संरक्षण दलात अधिकारी .पदी जाण्याचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले व जिद्द व चिकाटीने मेहनत करून हे यश मिळवले आहे .त्याला यापूर्वी मुलाखतीमध्ये अपयश येत होते पण तो न खचता प्रयत्न करत राहिला.
त्याचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय आय.एन.एस.शिवाजी लोणावळा येथे झाले. वडील नौदलातून निवृत झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण जे.एन. पेटिट टेक्निकल हायस्कूल येरवडा पुणे व पदवीचे महाविद्यालयीन शिक्षण वाडिया कॉलेज पुणे येथे झाले. अजयची आई वनिता सूर्यवंशी त्याची बहीण श्वेता सूर्यवंशी यांनी त्याला सर्वपरीने भक्कम पाठिंबा व प्रोत्साहन दिले. अजयचे देश सेवेचे स्वप्न पूर्ण झाले याबाबत बुध पंचक्रोशी तर्फे अजयला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
.jpg)




Social Plugin