राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : नुकत्याच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये कलगाव येथील डी. व्ही.एस. पी. एम. विद्यालय कलगाव येथील शाळेचा निकाल ८२.५० टक्के लागला असून उर्दू शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांकावर मुलीच राहिले आहेत.
यावर्षी 51 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डी व्ही एस पी विद्यालय मध्ये प्रथम क्रमांक नंदिनी निलेश बागेश्वर 83.80% व द्वितीय क्रमांक साधना प्रदीप मनवर 80.20% तर तिसऱ्या क्रमांकावर राजनंदनी भाऊराव चव्हाण 80.60% गुण मिळाले आहे. शाळेतून प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व सर्व शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक मांगलेकर सर व संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांना देतात.
वसंतराव नाईक उर्दू हायस्कूल मधील प्रथम क्रमांक खनसा मरियम एजासोद्दीन शेख हिला 90%, दुसऱ्या क्रमांकावर इफरा माहीन जावेद इकबाल हिला 85 % तर तिसऱ्या क्रमांकावर तायबा उरूज मोहम्मद शराफत 82 %, चौथ्या क्रमांकावर अनशिरा सना तौफिक 81 % , व महेका अफशा अरिफोद्दीन 79 % गुण मिळाले आहे. उर्दू शाळेच्या पहिल्या पाच क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. यामुळे सगळीकडे आनंद व्यक्त केल्या जात आहे. विद्यार्थिनी आपले यशाचे श्रेय मुख्याध्यापक सय्यद हबीब व शिक्षकासह,आई-वडिलांना दिले आहे.





Social Plugin