Ticker

6/recent/ticker-posts

परमपुज्य परमात्मा एक मंळ नागपुर च्या पंचवार्षिक निवडणुकीत आदर्श एकता पॅनल चा प्रचंड बहुमताने विजय



ग्रामिण प्रतिनीधी : यादवराव बुराडे

खापा (तुमसर) : परमपुज्य परमात्मा एक एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपुर ची पंचवार्षिक निवडणुक दिनांक १८ मे २०२५ ला पार पडली, यामंध्ये एकुन पाच पॅनल व दोन अपक्ष असे एकुण ७७ उमेदवार रिंगणात होते, सकाळी ७:३० वाजता पासुन मतदान सुरु झाले व मतदाना नंतर लगेच मतमोजणी सुरू झाली, यामंध्ये सुरुवाती पासुनच आदर्श एकता पॅनल ने आघाडी घेतली ती आघाडी कायम ठेवत शेवटी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. बाबांचे विचार सेवकापर्यंत पोहचावेत या करीता सोनकुसरे काकाजी व राऊत गुरुजी यांनी पुढाकार घेऊन पॅनल लढवली. परमात्मा एक सेवकात सुरुवाती पासुनच परिवर्तनाची लाट दिसुन आली,मतदान केंद्रावर परमात्मा एक सेवकांशी संवाद साधला 

तेव्हा त्यांनी सांगीतल की, यावेळी आम्ही परिवर्तन नक्की घडवू बाबा जुमदेवजींचा मार्ग हा सत्यावर आधारित आहे या मार्गात व्यसनमुक्ती अंधश्रद्धा दुर होते. अनेक दुखी: कष्टी लोक या मार्गात येवुन सुखी झाले. विजयी आदर्श एकता पॅनल कडून ईश्वर चिचघरे,प्रदिप चौधरी,सुभाष दहेकर,रविंद्र गायधने,महेंद्रसिंग गुरबेले,रामेश्वर जोगी,सुरेश कळंबे,रविंद्र खापरे,रमेश नखाते,टिकाराम पराते,किरण राऊत,गुलाब साठवने,हेमराज सिंदेकर,देवराम तुमसरे,तापेश्वर वैद्य हे उमेदवार उगवता सुर्य या बोधचिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत एकून ५ पॅनल व दोन अपक्ष उमेदवार असे एकून ७७ उमेदवार रींगणात होते यात अनुक्रमे छत्री - ८३१९५,पतंग-१६१८६,बस-७९७९८,आंबा-३००३७,उगवता सुर्य -१,५६,७४९ तर अपक्ष ३२३ मते मिळाली. संपुर्ण भारतातील सेवक येवुन आपल्या मतदानाचा हक्क वजावला त्यांचे धन्यवाद व विजयी पॅनल चे अभिनंदन व बाकी सर्व उमेदवारांना पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा.