मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव दि. 6 मे रोजी आज खरीप हंगाम 2025 पूर्व तयारीच्या अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळा आज उत्साहात पार पडली.तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालेगाव आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा तालुक्यातील मुख्य तहसील सभागृह कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.कार्यशाळेचे उद्घाटन मालेगाव रिसोड आमदार श्री अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस ह्या होत्या.तर तसेच मालेगाव तहसीलदार श्री दीपक पुंड ,अरिफ शहा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम,अनिसा महाबळे प्रकल्प संचालक आत्मा, तालुका कृषी अधिकारी श्री कैलास देवकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामातील पीक योजना, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान,जैविक शेती, खत व कीड व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी गटातील शेतकरी व कृषी सहायक, यांचाही कार्यशाळेत सहभाग होता.ह्या वेळी संदिप घुगे, गणेश उंडाळ,गजानन शिंदे,बबलू जैन,विनोद घुगे,संजय मांडवगळे,प्रिया पाठक,मनीषा घुगे, अजिंक्य मेडशीकर सह तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती. शेतकऱ्यांना कृषी विभागातील विविध योजनेची माहिती अमोल नवघरे यांनी उपस्थिती शेतकऱ्यांना दिली.कार्यशाळेच्या शेवटी शेतकऱ्यांच्या शंका समाधान सत्रात तज्ज्ञांनी त्यांच्या अडचणींवर उपाय सांगितले.शेतीत विज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम वाळुकर मंडळ कृषी अधिकारी तसेच आभार प्रदर्शन धनंजय शितोळे यांनी केले.
Social Plugin