देगलूर:- प्रतिनिधी -
अड़त व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी, एक आदर्श खेळाडू व अत्यंत दक्ष एन. सी. सी. कॅडेट म्हणून ओळख असलेल्या सचिन यादवराव वनंजे यांचे दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी काश्मीर येथे देशसेवा बजावित असताना शहीद झाले आहेत.
विशेष महत्वाची बाब म्हणजे ते सुट्ट्याच्या कालावधीत गावी आल्यानंतर आपल्या देगलूर महाविद्यालयाच्या मैदानावरील सर्व विद्यार्थ्याना पोलीस व सैन्य भरतीचे बाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन सतत करित होते.
देशसेवा बजावत वीरमरण प्राप्त झालेल्या सचिनला अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार , गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य एम एम चमकुडे, उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील , एनसी सी प्रमुख डॉ नीरजकुमार उपलंचवार, प्रसिद्धीप्रमुख डॉ. बी. आर. कतूरवार, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Social Plugin