Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यातील पाणी समस्या निकाली काढण्याकरिता जलतारा व विविध उपचारासाठीकृतिशील सहभाग घ्यावा : श्याम सवाई



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

परिसरातील प्रथम नेत्रदात्या गंगाबाई रामदास सवाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सहा जलतारे केले शेतात निर्माणकारंजा पाणी समस्येवर मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील गावांची संख्या वाढती आहे अशात जिल्हाधिकारी भुवनेश्वर मॅडम व उपजिल्हाधिकारी कैलास देवरे जी आणि कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संतोष बाळके सर या समस्येवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या मंडळींचा सहभाग घेऊन पावसाचे पाणी जिल्ह्याच्या शिवारातच थांबावे यासाठी प्रयत्न चालवला आहे या पाणी महायज्ञात जिल्हा प्रशासन व शासकीय विविध कार्यालय आपल्या परीने सहयोग देत आहेत सदर जलतारा याला रोजगार हमी योजनेची काही प्रमाणात सात आहे परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेत बसत नसले तर त्यांनी या योजनेपासून पळवाट  न करता आपल्या घरातील किंवा आपल्या आठवणीतील काही व्यक्तींच्या स्मृती निमित्य किंवा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस इत्यादी बाबींना लक्षात घेऊन स्वतःच्या शेतामध्ये तसेच शक्य होत असल्यास आपला जन्म ज्या गावात झाला अशा ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर हे जलतारे शेतातील शोषखड्डे करण्याकरिता आर्थिक मदत करावी त्या गावाला तसेच सहकार्य करावे शेतातील शोषखड्डा दत्तक घ्यावा जसे आम्ही आमच्या शेतामध्यच परिसरातील प्रथम नेत्रदात्या गंगाबाई रामदास सवाई यांच्या आठवणी सहा जलतारे निर्माण केले आहे सर्वधर्म मित्र मंडळ च्या माध्यमातून याबाबत आम्ही जनजागृती आणि सहकार्य करण्याच्या उद्देशाला व्यापकता मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे आपण सुद्धा आपल्या परिसरात आपल्या आठवणीत व्यक्तींची किंवा आपल्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या जन्म गावात स्वतःच्या शेतात किंवा शासकीय जमिनीत जलतारे दत्तक योजनेमध्ये सहभागी व्हा केवळ ही योजना रोजगार हमी योजनेची संबंधित न ठेवता याला प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे

कारण पाऊस हा शेत पाहून परत नसून तो सर्वत्र पडतो आणि अशा पद्धतीने पडलेला पाऊस हा गावांमध्येच थांबावा यासाठी या उपचाराची आवश्यकता आहे त्यामुळे सर्व धर्म मित्र मंडळ द्वारे आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा आपापल्या परीने जलतारे शेतातील शोषखड्डे दत्तक घ्यावे व त्या परिसरात पावसाचे पाणी थांबवण्यासाठी उपचाराची निर्मिती करावी यामधून वाशिम जिल्हा हा पाणीदार होईल आणि सध्या वातावरणातील बदलांमुळे होणारे त्रास भविष्यात आपल्याला भोगावे लागणार नाही अशा आशावादाने या ठिकाणी थांबतो आणि आपापल्या परीने आपण जलतारा दत्तक अभियानात सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे