राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस तालुक्यातील हजारो लाभार्यांना दिवाळीपासून पगार नाही त्यातच शासनाने डिबीटी प्रक्रियासाठी आधारकार्ड अपडेट करुन संजय गांधी विभागात जाऊन मोबाइल नंबर देणे नंतर ओटिपी आल्यावर डिबीटी प्रक्रिया पुर्ण केल्यावरही दोन-चार पहिने पगार न आल्याने तसेच काही लाभार्यांकडे मोबाइल नाही तर काहींचे आधार अपडेट करतांना फिंगर येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे
तसेच दिवाळीपासून पगार आली नाही म्हणून रोज शेकडो श्रावणबाळ, दिव्यांग लाभार्थी तहसिलमध्ये चकरा मारत आहेत त्यातच तहसिलचे कर्मचारी उद्धटपणे वागतात त्यांना उडवाउडची उतरे देतात त्यामुळे वयोवृद्ध,अपंग अशिक्षित असल्याने त्यांना मानसिक व शारीरिक आर्थिक त्रास सोषावा लागत असल्याने हि बाब भुमीपुत्र संघटनेच्या पदाधिकार्यांच्या लक्षात आल्यावर अपंग निराधारांना सोबत घेवून तहसिदारांना भेटून श्रावणबाळ,निराधारांच्या समस्याबाबत सांगितले
Social Plugin