Ticker

6/recent/ticker-posts

पैशाच्या मोहापेक्षा विकासाचे स्वप्नमोठे मांडवा गावासाठी योग्य सरपंच निवडा

 पैशाच्या मोहापेक्षा विकासाचे स्वप्नमोठे मांडवा गावासाठी योग्य सरपंच निवडा


 राजपाल बनसोड  प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस तालुक्यातील मांडवा गावातील सरपंच पद हे यंदा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव आहे. ही निवडणूक फक्त एका उमेदवाराची निवड नाही, तर संपूर्ण गावाच्या विकासाचा मार्ग निश्चित करणारी संधी आहे.गावातल्या प्रत्येक नागरिकाने यावेळी पैसे, जाती-पाती वर न जाता " योग्य उमेदवार " निवडण्याचा निर्णय घ्यावा, हे अत्यंत आवश्यक आहे.पैशाचा लाभ पण दीर्घकालीन नुकसान होणार हे निश्चित.अनेकदा निवडणुकीच्या काळात मतदारांना थोडे पैसे, दारू किंवा इतर वस्तू देऊन फसवले जाते. काही लोक 500 रुपये घेऊन आपला मताचा हक्क विकतात.पण विचार करा.हे 500 रुपये घेऊन तुम्ही पाच वर्षांच्या भविष्याचा सौदा करत आहात.जर पाच वर्षांमध्ये एखाद्या उमेदवाराने काहीच काम केले नाहीतर तुम्ही दररोज किती गमावत आहात याचा विचार करा.५ वर्ष = १८२५ दिवस ५०० रुपये / १८२५ दिवस =दररोज फक्त २७ पैसे!म्हणजे दररोज केवळ २७ पैशांच्या बदल्यात तुम्ही तुमच्या गावाचा रस्ता, नळ, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य अशा गोष्टींचा बळी देत आहात.योग्य उमेदवार म्हणजे कोण?जो गावातील प्रत्येक नागरिकाला,सर्व जाती ला सर्वसमान पाहतो, जो गावाच्या गरजा ओळखून काम करायला तयार आहे.जो शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, शेती यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देईल व गावाच्या विकासाला गती आणणार.जो गावातील दलित, महिला, वृद्ध, तरुण यांच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी करेल.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो पैसा वाटून नव्हे तर विश्वास जिंकून निवडून येईल.

लोकशाहीमध्ये "लोक" हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहेत. जर गावकरी एकजूट राहिले तर कुणीही उमेदवार तुमचं मत विकत घेऊ शकत नाही. गावातील प्रत्येकाने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे कारण सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.उमेदवाराचे अगोदर चे कामतपासावे त्यानी गरीबासाठीकाय धावप केली.याआधी तो कोणत्या सामाजिक कामात, कार्यात सहभागी झाला आहे? त्याने गावासाठी कोणती कामे केली आहेत ? त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे.

 ( निष्कर्ष, मांडवा गावातील आगामी सरपंच निवडणूक ही केवळ एक मत घेण्याची प्रक्रिया नाही. ती गावाच्या पुढील पाच वर्षांच्या वाटचालीचा निर्णय आहे.पैशाच्या मोहापासून सावध राहा, आणि असा उमेदवार निवडा जो माणूस म्हणून सच्चा, कार्यक्षम आणि गावाच्या हिताचा विचार करणारा असेल. पैशाच्या 500 रुपयांपेक्षा गावाच्या उज्वल भविष्यासाठी विचार करा.आणि योग्य उमेदवारालाच निवडा.मग बघा गाव कसे बदलून जाणार. ऍडव्होकेट रणजीत विठ्ठल धवणे बीए. एलएलबी. )