पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजाः भारतीय सैन्य दलाने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दाखवलेल्या पराक्रम आणि शौर्याचा गौरव म्हणून येथे भारतीय जनता पक्ष शहराच्या वतीने १९ मे रोजी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला देशभक्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीत सहभागी ७० मीटरच्या ध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधले.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभापती यांच्या निवासस्थानापासून या भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, देशभक्त नागरिक, समाजसेवक, माजी सैनिक, विद्यार्थी, महिला आणि युवक- या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार सईलाई डहाके व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्थानिक नेताजी सुभाषचंद्र बोस, जाणता राजा चौक, छत्रपती
शिवाजी महाराज नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, भगतसिंग चौक मार्ग ही तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीत आमदार सईताई डहाके, भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, शहराध्यक्ष प्राजक्ताताई माहितकर, माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, संदीप काळे, माजी नगराध्यक्ष निशा कॉलेजच्या गोलेछा, माजी नगरसेविका चंदाताई कोळकर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशालीताई येळणे, मीनाताई काळे, शुभांगी रवाळे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर, भाजप पदाधिकारी विजय पाटील काळे, किरण चौधरी, डॉक्टर शार्दुल डोणगावकर, उमेश माहितकर यांच्यासह इतर सहभागी झाले होते. तिरंगा रॅलीदरम्यान देशभक्त नागरिकांनी 'भारत माता की जय' चा मोठा जयजयकार केला त्याने कारंजा शहर दुमदुमले होते. रॅलीत रफ अँड टफ फिटनेस ग्रुपने उल्लेखनीय सहभाग नोंदवला





Social Plugin