अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
मा.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय दिनांक 8 एप्रिल 2025 व 30 एप्रिल 2025 अन्वये माननीय जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यातील पात्र घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पात्र लाभार्थी यांनी तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत किंवा स्वतःही स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक व घरकुल मंजुरीची यादी चा क्रमांक अपलोड केल्यानंतर सदरील पात्र लाभार्थ्यांना तहसीलमार्फत मोफत ई पास देण्यात येणार आहे.आणि त्यांनी त्यांना असलेल्या नजीकच्या वाळूघाटापासून पसंती क्रमांक दिल्यास त्या वाळू घाटावरून त्यांची ओळख पटवून त्यांना पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अंबड तालुक्यातील जवळपास पंधरा हजार पाचशे लाभार्थी असून त्यांच्या याद्या गावनिहाय तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक यांना देण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याकरता गटविकास अधिकारी यांच्यामार्फत ग्रामसेवक यांना सांगण्यात आलेले आहे.तलाठी, मंडळ अधिकारी यांची बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता चे सर्व माहिती इत्यंभूतपणे देण्यात आलेली आहे.सदर योजना ही 10 जून 2025 पर्यंत असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले वाहन व भरण्याकरता साहित्य घेऊन मंजुरी झाल्यानंतर रेती उपलब्ध करून घ्यायची आहे.सदर योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा याविषयी आवाहन करण्यात येते.त्याबरोबर शासकीय यंत्रणांना शासकीय कामांना रेतीची मागणी झाल्या नुसार बारा हजार आठशे ब्रास रेती त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.अंबड तालुक्यातील 10 रेती घाटावरून सदरची रेती उपलब्ध करून देण्यात येणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे...
उपरोक्त संदर्भ अन्वये मा.आमदार नारायण कुचे विधानसभा सदस्य बदनापूर यांनी उपस्थिती लावून उपरोक्त शासन निर्णयानुसार पात्र घरकुलधारकांना मोफत पाच ब्रास रेती देण्यात येणार असून सदर योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन केलेत्याचबरोबर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी तथा सरपंच यांना सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले
सदर वेळी तहसीलदार विजय चव्हाण,गटविकास अधिकारी उदय राजपूत,मुख्याधिकारी उकिरडे मनोज,नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता दगुला व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.





Social Plugin