Ticker

6/recent/ticker-posts

राहेरी बु. येथे विजेचा लपंडाव तीन महिन्यांपासून सुरू ग्रामस्थ त्रस्त--- महावितरण आधिकारी व्यस्त!!!



सरपंच पती बालाजी देशमुख यांचा अभियंत्याला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा


सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- तालुक्यातील राहेरी बु गावात गेल्या तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. मात्र, वीज गेल्यानंतर ती केव्हा येईल? याची खात्री नसल्याने गावतील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. महावितरण कंपनीने तातडीने दुरुस्तीचे कामे करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत महावितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री. जांभुळकर यांना वारंवार फोन करून व भेट घेऊन तोंडी सागून त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. गांवातील लाईट सुरळीत केली नाही. लाईटअभावी जर एखाद्या नागरीकास विषारी साप, विंचू डसून कोणाची जीवितहानी झाल्यास यास सर्वस्वी महावितरण कार्यालय जबाबदार राहणार आहे.

विजेचा लंपडाव सुरु असताना वीज देयक मात्र ठरल्याप्रमाणे पेक्षा जास्त येते. ते भरावेच लागते. त्यामुळे, महावितरणने तातडीने लक्ष देऊन गावतील वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवावा. नागरिकांवर आंदोलनाची वेळ आणू नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

 याबाबत महावितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री. जांभुळकर यांना निवेदनदेखील देण्यात आले असून, या निवेदनानुसार, दि.२९ मेपर्यंत वीज पुरवठा सुरूळीत न केल्यास सिंदखेडराजा महावितरण कार्यालयावर कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहेरी बु,  सरपंच पती बालाजी देशमुख , मा.सरपंच सुभाष देशमुख, ग्रा.सदस्य शंकर दधरे, प्रलय देशमुख व गावकऱ्यांनी आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे केला आहे.