Ticker

6/recent/ticker-posts

घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारागृहातील वास्तव मांडणारे पुस्तक प्रकाशित होणार - सुशांत कुटे "



*शिरुर ग्रामीण प्रतिनिधी* - (शैलेश जाधव)


राजकारण आणि समाजकारणात संघर्षशील प्रवास करणारे मा. सुशांत कुटे यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केलं आहे की, "राष्ट्रवादीमध्ये प्रवेश ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती." पक्षीय राजकारणातील अनुभवातून सावरत त्यांनी आता स्वतंत्र सामाजिक वाटचाल सुरू करत "भुमीपुत्र" ही संघटना स्थापन केली आहे.

मा. सुशांत कुटे यांनी मनसेतून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. या पंधरावर्षीय वाटचालीत ते मनविसे शहराध्यक्ष, मनसे शहराध्यक्ष आणि जनहित कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून सक्रीय राहिले. अनेक आंदोलने, विशेषतः कोरोना काळात विजबिलाविरोधातील आंदोलनामुळे १४ दिवस तुरुंगवास त्यांना भोगावा लागला.या कारावासातील अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन यंदाच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर होणार आहे.

> "कारागृहातील भयानक वास्तव समाजासमोर मांडणे ही जबाबदारी म्हणून मी घेतली आहे," असे मा. कुटे यांनी सांगितले.राज ठाकरे यांच्यावरील अपार श्रद्धा आजही त्यांनी जपलेली असली, तरी स्थानिक पातळीवरील पक्षकार्याविषयी असमाधानामुळे २५ मार्च २०२४ रोजी त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता."भुमीपुत्र" प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्य सुरू ठेवणार असून, पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

महाविद्यालयीन काळात त्यांनी शुल्कवाढ, संभाजीनगर नामांतर, वीज प्रश्नांवर आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात अभिनव आंदोलनांची शैलीही त्यांनी उभी केली. विशेष मुलींशी सलग १४ वर्ष रक्षाबंधन साजरे करण्यासारखा सामाजिक उपक्रम त्यांनी सतत सुरू ठेवला.या दीर्घ संघर्षाच्या प्रवासात रविंद्र गुळादे यांची साथ अनमोल ठरली.

> "या सर्व चढ-उतारांच्या काळात रविंद्र गुळादे हे माझे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्यामुळे मला प्रचंड वैयक्तिक नुकसान सहन करावे लागले आहे," अशा शब्दांत मा. सुशांत कुटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रकाश धारीवाल यांच्याशी असलेला स्नेह आणि अनेक संकटसमयी मिळालेला पाठिंबाही त्यांनी खास उल्लेख करून मान्य केला.आज राजकीय भूमिका स्पष्ट करताना मा. कुटे म्हणाले, "पक्ष बदलले, चुकाही झाल्या... पण आता मी पक्षापेक्षा समाजासाठी लढण्याचा निर्धार केला आहे."