ग्रामीण प्रतिनिधी: यादवराव बुराडे
खापा (तुमसर) : प्रहार तर्फे सामाजीक,राजकीय,शैक्षणिक ई. दखलपात्र कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याकरीता पक्षातर्फे १ महिण्या आधी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामंध्ये विभाग स्तरावर नागपुर,भंडारा,गोंदिया,चंद्रपुर,गडचिरोली या जिल्ह्यामधुन जवळपास ५०० ते ६०० कार्यकर्त्यांनी अर्ज सादर केले होते, छाननी अंती ११ कार्यकर्त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विभागस्तरावर गेल्या २ वर्षापासून उल्लेखनीय कामगीरी केल्या बद्दल विभागस्तरीय प्रथम पुरस्कार श्री शेषराव गणविर (प्रहार दिव्यांग (अपंग) क्रॅांती संघटना तुमसर तालुका प्रमुख) यांना मा.बच्चु भाऊ कडू यांच्या हस्ते गौरवचिन्हं,प्रमाणपत्र व झाड देवुन गौरव करण्यात आला.
प्रोत्साहन पुरस्कार मा. चिंतामण तिबूडे मोहाडी तालुका प्रमुख( जनशक्ती पक्ष) प्रोत्साहन पुरस्कार मा. रवींद्र गभने तुमसर तालुका प्रमुख (जनशक्ती पक्ष) यांना देण्यात आला. दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी सुरेश भट सभागृह रेशीम बाग नागपुर येथे हजारो प्रहार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. बच्चु भाऊंच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन तिरंगा झेंडयावा अभिवादन करुन थोर महापुरुषांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. बच्चु भाऊ कडू यांनी सांगितले की, कोणताही पक्ष कींवा पार्टी कार्यकर्त्यांची सत्कार व सन्मान करीत नाही. पार्टी व पक्ष हे कार्यकर्त्याच्याच भरवशावर चालत असतात. तेव्हा सामाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचे ठरविले. याप्रसंगी नागपुर विभागाचे समन्वयक श्री देशमुख साहेब, नागपूर,गोंदिया,भंडारा चे प्रमुख श्री रमेशजीं कारेमोरे जी, हनुमंतराव झोटींग साहेब (विदर्भ प्रमुख), रवीभाऊ मने, दिव्यांग संघटना जिल्हा अध्यक्ष भंडारा, मा. अंकुश भाऊ वंजारी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष भंडारा, तसेच सर्व जिल्हाप्रमुख,सर्व तालुका प्रमुख, तसेच सर्व पदाधिकारी व हजारो च्या संख्येने उपस्थित प्रहार सेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
Social Plugin