Ticker

6/recent/ticker-posts

शाहीर भिमराव अंभोरे यांची 'भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी' च्या जिल्हाध्यक्षपदी निवड



 दि.२५ मे २५. मेहकर 

मुंबई (चेंबूर) येथे भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी' ची महत्वपूर्ण बैठक दि २४/०५/२०२५ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकशाहीर वामनराव घोरपडे यांचे अध्यक्षेतखाली संपन्न झाली.या कार्यक्रमात शाहीर भिमराव दौलतराव अंभोरे  यांची भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी या संस्थेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शाहीर भिमराव अंभोरे यांची गत ४५ वर्षांपासून समाजप्रबोधन तथा कलावंतांच्याप्रती आदर आणि तळमळ पाहता  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकशाहीर वामनराव घोरपडे यांनी त्यांची नियुक्ती केली व मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

    यावेळी कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी सदैव लढा देण्याची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. शाहीर अंभोरेच्या नियुक्ती बद्दल  उपस्थितांनी मनापासून हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     बैठकीला मार्गदर्शक म्हणून शाहिर संभाजी भोरे, शाहिर वामनराव घोरपडे ,भारत वाघमारे  (अध्यक्ष.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष-शिवशक्ती -भिमशक्ती),प्रकाश रे.शिवशरण,सचिव-भारतीय सम्यक क्रांती लोक कला प्रबोधनी,शाहीर बलभीम भोंडवे,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त यांचे मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्रातील अनेक कलावंत या बैठकीला उपस्थित होते. नियुक्तीबद्दल शाहीर भिमराव अंभोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.