Ticker

6/recent/ticker-posts

वीज पडून १६ वर्षीय यश लाटेचा दुर्दैवी मृत्यू; मुरबाड तालुक्यात शोककळा

 


प्रतिनिधी -जितेश उबाळे ( ठाणे )

मुरबाड (ठाणे) – मुरबाड तालुक्यातील इंदे गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास वीज पडून यश विजय लाटे (वय १६) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात आणि तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यश लाटे हा यावर्षी इयत्ता १० वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. अभ्यासात हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा असलेला यश भविष्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा घरच्यांना होती. मात्र अचानक आलेल्या या आकाशीय आपत्तीने त्या सर्व आशा क्षणातच धुळीला मिळाल्या.घटनेच्या वेळी यश घराजवळच असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्याचवेळी वीज कोसळल्याने यशला ती लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मुरबाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. विविध सामाजिक संघटनांकडून यशला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे, तसेच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला योग्य ती मदत मिळावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.