Ticker

6/recent/ticker-posts

सातारा टेंभूर्णी रस्त्यावरील पुसेगावात खड्ड्यात वृक्षारोपण , महामार्गावर चरी खोदून कायमचा रस्ता बंद करू :- धीरज जाधव



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 पुसेगाव येथे  डॉ सुरेश जाधव यांचे  दवाखान्यापासून  ते   येरळा नदीपर्यंत ३०० मीटरचे रस्ता रुंदीकरण होत नसल्यामुळे   प्रशासनाचा निषेध म्हणून येथील धीरज जाधव यांनी श्री सेवागिरी  मंदिरासमोरील  मेन रोड वरील खड्यात  वृक्षा रोपण केले .

सातारा टेंभूर्णी NH 548C  या महामार्गावर पुसेगाव येथील  अर्धवट सोडलेले काम मेगा इंजिनिअरींग कंपनीने पूर्ण करावे यासाठी पुसेगाव येथील  धीरज जाधव , नितीन  देशमुख. , राम  जाधव. , रणधीर जाधव ,  यांनी मागच्या   तीन महिन्या पूर्वी  छ. शिवाजी चौक पुसेगाव  येथे १५ दिवस धरणे आंदोलन केले . पुसेगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन एक दिवस  पुसेगाव बंद ठेवले ,  रस्ता रोको केला . त्याचे  फलित म्हणून मागच्या   २  वर्षापूर्वी  मेगा इंजिीअरिंग कंपनीने  लगतच्या मालमत्ता ची मोजणी साठी १४ लाख ८८ हजार रूपये  भूमिअभीलेख कार्यालय कडे भरले होते  ,  त्या संबधित  लगतदार मालमत्ता धारक  यांच्या मालमत्ताची  भूमीअभिलेख कार्यालय  वडूज यांनी शासकीय मोजणी आणून त्या मोजल्या  ,  हद्दी कायम केल्या ,  नकाशा तयार केला  परंतु  त्यानंतर प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरण  बाबत ठोस पावले उचलली गेली नसल्याने धीरज  जाधव ,  माजी  ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव  उर्फ पी डी रामभाऊ  जाधव  , शुभम इंगवले ,  योगेश मदने यांनी  भर रस्तावर पडलेल्या खड्ड्यात  वृक्षारोपण केले ..  आणि  येणाऱ्या पुसेगाव यात्रे पूर्वी रस्ता   रुंद करावा अन्य था  रस्त्यावर चरी खोदून कायमचा रस्ता बंद करू असा  इशारा  धीरज जाधव यांनी दिला  .