Ticker

6/recent/ticker-posts

PMAY ग्रामीण योजनेसाठी मुदत वाढ लाभार्थ्यांनी ३१ मे पर्यंत सर्वे किंवा नोंदणी करून घ्यावी:*सौ दिपाली नितीन तायडे ग्रा प सदस्या मेडशी



मालेगाव :पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी मालेगाव तालुक्यातील गरजवंत ग्रामस्थांनी आपली नोंदणी सर्वे आवास प्लस मोबाईल अॅपद्वारे सेल्फ सर्वे द्वारा करावी असे आवाहन सौ दिपाली नितीन तायडे ग्रा प सदस्या मेडशी यांनी केले आहे. मागेल त्याला घरकुल पंतप्रधान यांच्या घोषणेनंतर तालुक्यात पी.एम. आवास, प्लस घरकुल योजना नोंदणी सुरू आहे. ज्या लाभार्थाचे मागील यादीत नाव नसेल त्यांनी या पी.एम. आवास प्लस योजनेचा लाभ घ्यावा व आपली नोंदणी सेल्फ सर्वेतून मोबाईल मधून आवास प्लस अॅपद्वारे नोंदणी करावी.

 पी.एम.आवास प्लस योजनेची अंतिम तारीख १५ मे होती. परंतु आता अर्ज स्वीकारण्याच्या तारखीत मुदत वाढ देण्यात आली आहे ती ३१ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी पंतप्रधान घरकुल

आवास योजनेचा लाभ घ्यावा. पी.एम.आवास प्लस यांनी निकषात बसणाऱ्या सर्वच गरजू नागरिकांना घरकुल मागण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी आपला अर्ज आपणच करावा ऑनलाईन सेल्फ सर्वे नोंदणी केल्यानंतर ऑफलाईन कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायत मध्ये जमा करावेत. या योजनेसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, तारखेच्या आत आपण आपली नोंदणी करून या पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या हक्काच्या घराचे मा लक व्हावे असे अहवान सौ दीपाली नितीन तायडे मेडशी ग्रामपंचायत सदस्ययांनी केले आहे.