Ticker

6/recent/ticker-posts

आज्ञात चोरट्याने बियरबार फोडून बारमधील ४१ हजार रोकडसह २ हजाराची बियर पळवली चोरटे सिसीटीव्ही कॅमेरात कैद



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

 बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड-देगलूर राष्ट्रीय महामार्गावर अटकळी शिवारात असलेला  रवीकिरण बियरबार अज्ञात चोरट्याने ४ रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फोडून बियर बार मधील नगद ४१ हजार रोकडसह २ हजाराची बियर पळवली.

बिलोली तालुक्यातील अटकळी येथील रामतीर्थ पोलीस ठाणे अंतर्गत उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर व देगलूर नांदेड या मुख्य रहदारी रस्त्यावर एक रवी किरण बियरबार आहे. या बियर बारचे मालक रवी मुद्दलवार हे नेहमी प्रमाणे ४ रोजी रात्री नियमित वेळेनुसार बियर बार बंद करून  गेले असता. त्याच रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी बियर बारचे मुख्य लोखंडी शटर लोखंडी सब्बलच्या साह्याने तोडून आतमध्ये प्रवेश करून बियर बार मधील मदिरा व कॅश काऊंटर असलेल्या रूमचा लॉक तोडून त्यामधील ४१ हजार रुपये रोकड व फ्रिज मधील २ हजार रुपयांचे बियर चोरून  पोबारा केला. परंतु हा सर्व प्रकार रविकिरण बिअर बारला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  चोरटे कैद झाले असल्याने  बियर बार मालकाने रामतीर्थ पोलिसात चोरीच्या घटनेची माहिती दिली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या सदर चोरट्यांना पकडणे रामतीर्थ पोलीसा समोर आता आव्हान उभे राहिले आहे.