झरी जामनी (प्रतिनिधी) – २४ एप्रिल २०२५ रोजी एकाच वाहनातून दोन स्वतंत्र रॉयल्टी टीपी वापरून गौण खनिज 'डेशी १०M' वाहतूक करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात वाहन क्रमांक MH22AN5142 असून, रॉयल्टी टीपी क्र. 29707 व 45300 हे दोन्ही एकाच दिवशी जारी करण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एका टीपीवर २ ट्रिप्स तर दुसऱ्यावर ३ ट्रिप्स दाखवण्यात आल्या आहेत.या प्रकारामुळे एका दिवसात एकाच वाहनाने खूप मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक केल्याचा संशय निर्माण झाला असून, यामध्ये खनिज तस्करीचा मोठा आरोप व्यक्त होत आहे. संबंधित टीपीच्या आधारे ETS प्रणालीद्वारे खनिजाची वस्तुनिष्ठ मोजणी करून रॉयल्टीमध्ये होणारा फरक वसूल करण्याची मागणी महाराष्ट्र तांडव न्यूजचे मुख्य संपादक मो. शहबाज मो. अकील यांनी केली आहे.
या प्रकरणी त्यांनी तहसिलदार झरी जामनी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून, जिल्हाधिकारी (खनिकर्म विभाग) यांना देखील याची प्रत पाठवण्यात आली आहे. शहबाज अकील यांनी त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे





Social Plugin