शौकत शेख @ग्रामीण प्रतिनिधी. गायकवाड जळगाव १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ १०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे. नागपूर. संभाजीनगर. मुंबई. कोल्हापूर. अमरावती. नासिक. कोल्हापूर. लातूर. व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च २०२५ घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (इ १०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला त्यामध्ये कै. विमलबाई गंगाधर गायकवाड जळगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गायकवाड जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर विद्यालयाचा शेकडा निकाल ८९.५५% लागला असून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण ६७ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून प्रथम क्रमांक गीता लक्ष्मण केस भट. व आनंद किशोर आगरकर ८३.८६% द्वितीय क्रमांक वैष्णवी अण्णासाहेब चीतारे ८१.६०% तृतीय क्रमांक तुषार शत्रुघन अंतरकर ८१.४०% असे गुण मिळाले आहेत विशेष श्रेणीमध्ये विद्यालयातील एकूण ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये विद्यालयातील २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये १४ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये १२ विद्यार्थी व पास श्रेणीमध्ये २ विद्यार्थी आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचे ओम शिव कृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक रावजी गायकवाड व सचिव प्रा. नंदकिशोर गायकवाड यांनी मनापासून अभिनंदन केले आहे तसेच गावातील सरपंच. मस्त यांनीही यशस्वी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आहे महाराष्ट्र ग्रामीण न्युज च्या वतीने सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा





Social Plugin