Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा तालुक्यात वादळीवाऱ्या सह पावसात विज पडून एक बैल व एका गाईचा जागीच मृत्यू; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!



सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे 

सिंदखेडराजा :-तालुक्यात १७ मे रोजी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विज पडल्याने एका बैल आणि एका दुधाळ गाईचा जागीच जागीच मृत्यू झाला.

राहेरी बु गावातील शेतकरी गोविंद कुंडलिकराव देशमुख यांची दुधाळ गाय अंदाजे (किंमत 70 हजार )विजेच्या धक्क्याने दगावली आहे.दुसऱ्या घटनेत दत्तापूर येथील शेतकरी नारायण राम पवार यांच्या अंदाजे ८० हजार रुपये किंमतीच्या बैलाचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजित दिवटे यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. तसेच तालुका पशुधन अधिकारी डॉ. मुंढे यांनी दत्तापूर ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. या नुकसानीसाठी शासकीय मदतीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.