डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये नवीन घरकुलासाठी सर्वेक्षण सुरू असून यासाठी ग्रामस्थांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे ग्रामपंचायत हद्दीत अल्पसंख्यांक तसेच बहुजाती समाजाची नागरिक वास्तव्यास आहेत मागेल त्याला घरकुल या घोषणेनुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे योजनेची नोंदणी करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल होती मात्र ती वाढवून 30 मे 2025 करण्यात आली आहे तरी नोंदणीसाठी लाभार्थ्यांनी जॉब कार्ड आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक ही कागदपत्रे देण्यात यावी नोंदणी पूर्ण केल्यानंतर संबंधित कागदपत्राची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश पाटील मुंदे यांनी केली आहे





Social Plugin