जुन्या आठवणी व गप्पागोष्टीत रमले माजी विद्यार्थी -
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावच्या श्री हनुमानगिरी हायस्कूल मधील सन 2006/07 च्या दहावीच्या बॅचने गेट-टुगेदर घेऊन शाळा माऊलीने दिलेल्या संस्काराचे दर्शन घडविले.
सुरुवातीस सर्व गुरुजनांना मानाचे फेटे घालून व पुष्पवृष्टी करत मुख्य कार्यक्रम स्थळी सन्मानपूर्वक आणले. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी ओळख करून मनोगते व्यक्त केली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनोगतात कृतज्ञतेची भावना व्यक्त होत होती.मनोगते ऐकताना हसू आणि आसू या गोष्टी घडून येत होत्या.
शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना आशीर्वाद देण्यात आले. त्यानंतर सर्व गुरुजनांना विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रखुमाईची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या या कृतार्थ भावनेने सर्वच गुरुजन भारावून गेले व व शाळा माऊली आनंदून गेली. तदनंतर सर्व गुरुजनांच्या वतीने श्री शरद पंडित सर यांनी मनोगत व्यक्त केले माजी प्राचार्य श्री हरिभाऊ माळी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस कॉन्फरन्स टेबल भेट देऊन त्यानी आपल्या दातृत्वाचे दर्शन घडविले.कार्यक्रमास माजी प्राचार्य ए.डी. जाधव, डी.पी. शिंदे , एस.बी. जाधव जे. टी. जाधव, व्ही. जे.जाधव, किसनराव शेडगे, एच. आर. पाटील संजय वायदंडे, सुधाकर माने, शरद पंडित,किशोर म्हेत्रे,पर्यवेक्षक आर. एन जाधव तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री मोहनराव गुरव व श्री विशाल माने यांनी सूत्रसंचालन केली श्री शिवलिंग शिखरे यांनी यांनी प्रास्ताविक केले विशाल अंकुशराव जाधव पाटील यांनी आभार मानले.





Social Plugin