बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
बुध ता . खटाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी भारतलाल चुनिलाल गांधी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांनी विद्युत मंडळामध्ये ४० वर्ष नोकरी केली होती . बुध, पुसेगाव परिसरातील शेतकरी , ग्रामस्थांची अनेक कामे केल्यामुळे ते सर्वांच्या परिचित होते . मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त किशोर गांधी यांचे ते वडिल होते . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे .





Social Plugin