अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील शहागड येथे भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला सलाम ऑपरेशन सिंदूर राबविणाऱ्या भारतीय सैन्य दलाला समर्थन देण्यासाठी शहागड ता.अंबड येथील राष्ट्रप्रेमी नागरिक भरतीय जनता पार्टीच्या वतीने देशाच्या सीमांवर आपल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम,त्याग व शौर्य यांचा सन्मान करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली शहागड येथे भव्य तिरंगा पायी रॅली काढण्यात आली.यावेळी माजी सैनिक दादासाहेब बोचरे,सैनिक स्वानंद लोने,माजी सैनिक पंडित राठोड,माजी सैनिक रमेश शेळके सैनिंकाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
ही भव्य तिरंगा रॅली शहागड बस स्थानकासमोरुन जिल्हा परिषद हायस्कूल ते शहागड बस स्थानक समोर समारोपण करण्यात आले या रॅलीत मोठ्या संख्येने देशप्रेमी सहभागी झाले होते.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिपकसिंह ठाकूर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके,राजू छल्लारे सर,रमेश शहाणे,झुंजळे आंबा,प्रदीप पवार,भगवान दादा बर्वे,अनिरुद्ध झिंजुर्डे,शिवाजी नाना मोरे,अरुण घुगे,डॉ.रमेश तारगे,इरफान सय्यद इम्रान पठाण,ईमतियाज मनीयार,बाबुराव वाळेकर,अर्जुन वाघ,संदीप फटंगळे,भगु दादा बर्वे,शोभालाल उंबरे, अशोक बोधे,नजीर शहा,नारायण बर्डे,समीर शेख, महेश कांबळे,आबासाहेब पवार,गणेश शेरकर,संतोष जाधव,इक्बाल बागवान,आसिफ कुरेशी,जमीरुद्दीन बागवान गावातील सर्व समाज बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin