शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
शिरूर, २९ मे – शिरूर बसस्थानकातील विविध समस्या आणि नागरिकांच्या सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी आज एक अभिनव आंदोलन करत खड्ड्यात झोपून प्रशासनाचे लक्ष वेधले. बसस्थानकासमोरील रस्त्यावर मोठा खड्डा असतानाही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन केले.
याआधीही फुलडाळे यांनी बसस्थानकातील समस्या तसेच शिरूर आगाराला नवीन बसेस मिळाव्यात यासाठी बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी पुणे विभागीय परिवहन अधिकारी कमलेश धनराळे, आगार व्यवस्थापक संगीता गायकवाड आणि स्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत समस्यांचे समाधान दहा दिवसांत केले जाईल आणि पुढील महिन्यात १० नवीन बसेस देण्यात येतील, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एक महिना उलटल्यानंतरही कोणतीही ठोस कृती न झाल्याने आज पुन्हा आंदोलन उभे राहिले.
प्रमुख मागण्या व आश्वासने:
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था: - सध्या स्वच्छतागृहाजवळ असलेली पाण्याची टाकी दुसऱ्या जागी हलवून नवीन ठिकाणी आरोहची व्यवस्था केली जाईल.
बसस्थानकातील रस्ते दुरुस्ती: - आतील रस्त्यांची दुरुस्ती दोन महिन्यांत करण्यात येणार.
नवीन बसेस: - शिरूर आगाराला लवकरच ५ नवीन बसेस देण्यात येणार.
वाहतूक मार्ग: - पुणे-अहिल्यानगर मार्गावरील बसेस शिरूर बसस्थानकातूनच चालवण्यात येतील.
पोलीस बंदोबस्त व पार्किंग: - स्थानकातील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाईसाठी पोलीस विभागाशी पत्रव्यवहार केला जाईल.
कचरा व्यवस्थापन व पाण्याच्या बाटलीचे दर: - कचर्याची योग्य विल्हेवाट व "नाथजल" पाण्याच्या बाटलीचे दर (१५ रुपये) फलक लावले जातील.
प्रकाश व्यवस्था: - मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाईट लावण्याचे आश्वासन.
सीएनजी पंपाबाबत माहिती: - आगारातील सीएनजी पंपाच्या प्रगतीविषयी माहिती देण्यात येणार.
ग्रामीण भागासाठी स्वतंत्र फलाट: ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र फलाटाची मागणी.
उपस्थित मान्यवर
सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांच्यासह अनेक पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, आम आदमी पक्षाचे ॲड. सुभाष जैन, राष्ट्रवादीचे रवींद्र खांडरे, भाजपच्या प्रिया बिरादार, विजय नरके , राजेंद्र शहाणे , मनसेच्या डॉ . वैशाली साखरे , राजेंद्र महाजन , शंकर चाबुकस्वार, सोहेल शेख , शांतीलाल नहार , बाळासाहेब तातेड , अशोक गुळादे , बाळासाहेब आवारी , आधार छाया प्रतिष्ठानचा सविता बोरुडे , कोमल भणगे , हीना शेख , प्रीती बनसोडे ,आधार छाया प्रतिष्ठानचे प्रतिनिधी आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.





Social Plugin