Ticker

6/recent/ticker-posts

सातारा कारागृहात क्षयमुक्त भारत 2025 कार्यक्रम




बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन 2025 पर्यंत क्षय मुक्त भारत करण्याचे केंद्र शासनाचे तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र, साताराचे जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री डॉक्टर श्री सचिन पाटील यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथील इतर अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तसेच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ . सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . जालिंदर सुपेकर, कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 मे  ते 29 मे पर्यंत सलग 4 दिवस सदर “क्षयमुक्त भारत 2025 या शिबिराचे” आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये सातारा जिल्हा कारागृहामधील एकूण 15 महिला बंदी व 350 पुरुष बंदी यांची AI बेस डिजिटल एक्स-रे मशीनद्वारे क्षयरोग तपासणी करून सर्वांचे एक्स-रे काढण्यात आले. यानुसार ज्या बंदयांच्या एक्स-रेमध्ये काही दोष आढळून येतील त्यांचे उपचार तातडीने सुरू करण्यात येणार आहेत, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सचिन पाटील यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सचिन पाटील, विस्तार अधिकारी लोखंडे, आरोग्य सहाय्यक साखरे, जिल्हा प्रोग्राम कोऑर्डिनेटर कांबळे, जिल्हा पब्लिक प्रायव्हेट कॉर्डिनेटर जंगम, सोहेल पठाण, प्रथमेश बाबर, रमेश देशमुख तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, अति. वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, सुभेदार बागल, हवालदार पारधी, शिंदे, शिपाई चांद पटेल, राकेश पवार, सागर देवकर, सागर मासाळ, तुकाराम घुटुकडे, ज्योती शिंगेरे, लता काळकुटे, गीता दाभाडे, माधुरी वायकर, सतीश अब्दागिरे, यशवंत पाटील इत्यादी हजर होते.