Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महा आवास अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न



मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव :दि 3 रोजी मा. केंद्रिय मंत्री, ग्रामीण विकास, कृषि व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक ०३/०६/२०२५ रोजी ४.०० बालेवाडी पुणे येथे झाले त्या सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रदर्शन दुपारी 03:00 वाजता मालेगाव प.स. स्तरावर डिजिटल स्वरूपात लाईव्ह करण्यात आले तसेच त्याचप्रमाणे २०२४-२५ मध्ये मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना आवास मित्र अॅपचे प्रशिक्षण देण्यात आले व मालेगाव तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थ्यांची ई केवायसी e-kyc कॅम्प द्वारे करण्यात आली या कॅम्पला अनेक ग्रामपंचायतीचा जास्तीत जास्त प्रतिसाद व सहकार्य लाभले.

 या कार्यक्रमांमध्ये मालेगाव तालुका पंचायत समितीचे  गट विकास अधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना विविध योजनेबद्दल मार्गदर्शन केले. हे कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी निलेश शिरभाऊ, संदीप भिमटे, निलेश टनमने, सत्यपाल अंभोरे, भामदरे व इतर वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले