Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सईताई प्रकाश दादा डहाके यांच्याहस्ते ओपन जीमचे लोकार्पण सोहळा



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड ) क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका क्रीडा समितीच्या वतीने येथे उभारण्यात आलेल्या ओपन जीम आणि कबड्डी मॅटचे आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

स्थानिक तालुका क्रीडा संकुल आवारात २ जून रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर तालुका क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्ष तथा आमदार सईताई डहाके, तेजस्विनी डहाके, अजय श्रीवास व तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद काटोलकर उपस्थित होते. यावेळी

आमदार डहाके यांच्या हस्ते फीत कापून ओपन जीम लोकसेवेत रुजू करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण क्रीडा संकुल परिसराचे अवलोकन करून येथील समस्या जाणून घेतल्या. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करून येथे

सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक पराग गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमाला दीपक वानखडे, रवी गजभिये यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते