●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील महाळप्पा पटने विद्यालयात शनिवार दि.२१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगशिक्षक नागनाथराव पाटील माचनुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सलग दोन वर्ष झाले पाटील साहेबांनी वेळात वेळ काढून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना योग व आपल्या जीवनात योगाचे महत्व, रोगमुक्त जगण्याचं महत्त्व त्यांनी प्रत्यक्षात कपालभाती अनुलोम- विलोम सारख्या योगाच्या प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना करून दाखवला.तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक श्री शेख सर यांनीही विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व इतर योगांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दररोज योगा करण्याचा मूलमंत्र दिला. यावेळी शिक्षक प्रेमी भाजपा बिलोली तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष मारुती राहिरे, सर्व शिक्षक कर्मचारी, मुख्याध्यापक श्री लगडे सी. एम. या प्रशालेतील जवळपास १२७ विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते
Social Plugin