मालेगाव प्रतिनिधी-जावेद धन्नू भवानीवाले
गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदन प्रमोद सांगळे वाशिम जिल्हा प्रभारी दि. 11 जून रोजी मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांची सभा घेऊन एक निवेदन कैलाश मोतीराम राठोड तालुका अध्यक्ष व दत्तराव खेडकर सचिव यांच्या उपस्थितीत यांनी गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांना निवेदन देऊन आमदार माजी मंत्री व संघटनेचे राज्याअध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी पुकारलेल्या अन्यत्याग आंदोलनास ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पाठिंबा द्यावा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लादली केलेली वसुलीची अट रद्द करणे १० टक्के वाशिम जिल्हा परिषद पदभरती. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद नगरपंचायत प्रमाणे वेतन श्रेणी लागू करणे व इतर मागण्या संदर्भात पाठिंबा दर्शवण्यासाठी दि. 13 जून व 14 जून रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या आंदोलनास पाठिंबा देण्यात येणार आहे. अशी माहिती माहिती प्रमोद सांगळे वाशिम जिल्हा प्रभारी ग्रांम पंचायत कर्मचारी युनियन एनजिपी ४५११ जिल्हा वाशिम यांनी दिली आहे.
Social Plugin