सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- तालुक्यातील राहेरी बु येथील शिवाजी दिलीपराव देशमुख वय ३२ वर्षे यांनी काल दिनांक १५ च्या रात्रीला अंदाजे ८ वाजता स्वत: च्या शेतात मध्ये जाऊन आत्महत्या केली
सविस्तर माहिती अशी आहे की दिलीपराव देशमुख यांना दोन मुले व एक मुलगी असून मुलीचा विवाह झालेला आहे पण घरची आर्थिक परिस्थिती अधिकच हालाखीची असल्यामुळे शिवाजी मोठा असल्यामुळे परिस्थिती मुळे त्याला काही दिवस पुणे शहरात जाऊन मोलमजुरी केली असता मध्यंतरी वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे शिवाजीने पुणे शहर सोडून छत्रपती संभाजी नगर येथे मोलमजुरी करू लागला घरी एकच एकर शेती असल्याने आर्थिक परिस्थिती मुळे त्याला कामच करावा लागत होते आज सकाळी काही शेतकरी पेरणी करायला शेतात गेले असता शिवाजी ने लिंबाच्या झाडांला गळफास घेऊन आत्महत्या केली
आत्महत्याचे कारण मात्र वृत्त लिहीपर्यत समजलें नाही किंनगाव राजा पोलिस स्टेशन चे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले पूढील तपास ठाणेदार विनोद नरवडे व किनगाव राजा पोलिस स्टेशन चे कर्मचारी करीत आहे
" शिवाजी देशमुख हा घरचा करता पूरूषा ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्यांच्या आई व वडीलाची तब्येत साथ देत नसल्यामु ळे शासनाने आर्थिक मदतीचा हातभार लावावा अशी मागणी राहेरी बु येथील. गावकरी करीत आहे
Social Plugin