●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील माजी सरपंच प्रभाकरराव पेंटे यांच्या खरबाच्या शेतातील पडक्या विहीरीत दोन चार दिवसांपासून अडकून पडलेल्या रानमांजरास शनिवार दि.२१ जून रोजी संबंधित वन विभाग व परिसरातील वन्य जीव प्रेमींनी मोठ्या प्रयत्नांनी जीवदान दिले आहे.
आदमपूर वन परिसरातील कार्यतत्पर वनरक्षक सहदेव दोसलवार(देगलूर वनपरिक्षेत्र कार्यालय)यांना माहिती कळताचत्यांनी मांजरीला वर काढण्याचे नियोजन लावले.उपवनसंरक्षक केशव वाबळे,सहाय्यक वनसंरक्षक भारत खेलवाडे,देगलूर वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी संतवाले,वनपाल अभय शेवाळकर यांच्या मार्गदर्शनात,माजी सरपंच प्रभाकर पेंटे,वनमजूर सुभाष नाईक मिनकीकर,नागरिक बालाजी आरोटे केरूरकर,शिवा पैलवार मिनकीकर, सर्पमित्र राज मुंडकर आणि वन्यजीव प्रेमी जाफर आदमपूरकर आदिंनी दोरखंडाच्या सहाय्याने रानमांजरीला सुरक्षित वर काढीत जीवदान देत ताबडतोब नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.





Social Plugin