Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूर येथील मारूती मंदिर परिसरात पावसासाठी भंडारा



●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर 


 ●मौजे आदमपूर,ता.बिलोली येथील फुटक्या कुंट्या शेजारी माळरानावर विराजमान असणाऱ्या नवसाला पावणाऱ्या मारोती मंदिर परिसरात गणपत कोळनुरू व गावकऱ्यांच्यावतीने सोमवार दि.२३ जून रोजी पावसासाठी सामुहिक भंडारा करण्यात आला.मृग नक्षत्रात सुरूवातीस पावसाने दमदार सलामी दिली. त्यात सर्व आदमपूर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली.पण,आठ दहा दिवस उलटून गेल्यानंतरही पिकांसाठी पावसाने दडी दिली. यामुळे परिसरातील शेतकरी पाऊस व दुबार पेरणीच्या संकटास हवालदिल होतो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आवासून उभी आहे.

त्यासाठी नवसाला पावणाऱ्या आदमपूर परिसरातील माळरानावरील मारोती मंदिर परिसरात सामुहिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.सदरील भंडाऱ्यात माजी सरपंच  साईनाथ चिंतले,माजी सभापती व्यंकटराव पांडवे,अभिजित चिंतावार, गणेश पाटील,कान्हा देमेवार,गणपत कोळनुरे,गोविंद मुंडकर,लक्ष्मण हालबुर्गे,शिवाजी हालबुर्गे,सुमित चिंतावार,शिवदास मुंगडे, जाफर आदमपूरकर,शेख सद्दाम,शेख सलीम, बाळू डोंपे,पञकार काशिनाथ वाघमारे,मन्मथअप्पा मठपती,राम हालबुर्गे, बासरे,माधव राहिरे,जयराम भरगिरे,राजेश कोल्हे,चिगळ ,संभाजी लमले, कोळनुरे,मुंडकर पाटील,चोंडे,भरगिरे,कोकणे,डोईफोडे,मुंगडे,मुंगळे,देवकरे,पांढरे,चिंतले, व समस्त गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती.