पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा (लाड) ग्राम गंगापुर फाट्या जवळ रविवारी सकाळी ११च्या सुमारस् दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आ हे. घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक विधाता चव्हाण, शिवम खोंड दिपक सोनोने घटनास्थळी दाखल झाले व जख्मीना उपजिल्हा रुग्णाल्यात दाखल केले. गंभीर जख्मीचे नाव आजाब बाबूसिंग जाधव वय ४५ रा. रामनगर व किरकोळ जख्मी बबन चव्हाण वय ५५ कुसुम चव्हाण ५३ दोघेहीं रा. गंगापुर असे आहे तर आजाब जाधव यांना पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरानी तपासून उपचार करुण पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे हलविण्यात आले. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शीनी
तात्काळ मदत करत जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमी व्यक्ती व महिलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी वेगावर नियंत्रण न राखणे व चुकीचा ओव्हरटेक हे कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे.





Social Plugin