शिरूर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव)
गड-किल्ले ही आपली ओळख, आपला स्वाभिमान आणि आपला गौरवशाली इतिहास आहे. आजच्या मुलांमध्ये ही जाणीव निर्माण करण्यासाठी मातोश्री कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित किल्ले स्पर्धा 2024 उत्साहात आणि अभिमानाने पार पडली.स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिरूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभिजीत पाचर्णे म्हणाले,“इतिहास शिकवण्यासाठी पुस्तके पुरेशी नाहीत, त्याला स्पर्श, अनुभव आणि प्रेरणा लागते. किल्ले स्पर्धा हे त्याचे जिवंत उदाहरण आहे!”श्रीकृष्ण उद्योग समूहाचे उद्योजक सागर नरवडे यांनी स्पर्धेच्या कौतुकास्पद यशाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले, “ही फक्त स्पर्धा नाही, ही आपल्या मुलांमध्ये देशप्रेम आणि इतिहासाची रुजवणूक आहे. अशा उपक्रमांना आमचा कायमचा पाठिंबा राहील.”
🛡 *स्पर्धेत ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.*
📌 *विजेतेपद पटकावलेल्यांची यादी:*
🥇 *प्रथम* – युवा संघर्ष गणेश मंडळ, मुंबई बाजार
🥈 *द्वितीय* – सायेशा आढाव
🥉 *तृतीय* – काव्या बाफना
🏅 चतुर्थ – सिद्धांत मुथा
🏅 पाचवा – सिद्धार्थ पठारे
🏅 सहावा – श्रुती डहाळे
*या वेळी उपस्थित होते:*
मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष *अभिजीत आंबेकर*, पञकार *सतिश धुमाळ*, *मुकुंद ढोबळे*, *शैलेश जाधव*, *सतीश केदारी*, *किरण आपरे*, *साजिद शेख*, *प्रमोद वाघचौरे*, बक्षीस विजेते स्पर्धक, सहभागी विद्यार्थी आणि त्यांचे पालक.
🗣 *कार्यक्रमाचे स्वागत:* शैलेश जाधव
🎤 *सूत्रसंचालन:* सतीश धुमाळ
🙏 *आभार प्रदर्शन:* सतीश केदारी
📢 *विशेष उल्लेख:*
गड-किल्ल्यांचे प्रतिकृतीमधून साकारलेले स्वराज्याचे दृश्य पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला!
शाळकरी वयात देशभक्तीची बीजं रोवणाऱ्या या स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.jpg)




Social Plugin