Ticker

6/recent/ticker-posts

हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन,मोठ्या उत्साहात साजरा



मारोती एडकेवार हिप्पारगा थडी प्रतिनिधी 

हिप्पारगा थडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी येथे, आंतरराष्ट्रीय योग दिन  दिनांक 21 जून 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी शिक्षक वर्गाचा व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.त्यात योगशिक्षक,बालाजी लचगोंडा गेंदेवाड सरांनी, शस्त्र व सिद्ध पद्धतीने योगा विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली,कार्यक्रमाची सुरुवात मंत्रोच्चार व प्रार्थनेने झाली. सर्व विद्यार्थी व शिक्षक एका मंचावरी,मैदानावरती ताडासन, वज्रासन  त्रिकोणासन,भुजंगासन,पवन मुक्तासन, व शीर्षासन इत्यादी,आसनाचा विद्यार्थ्यांनी सराव केला. उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक,विद्यार्थी व सर्व विद्यार्थ्यांचे पालक, व मुख्याध्यापक मुत्येपोड सर यांनी योगशिक्षक, पर्यावरण प्रेमी शिक्षक बालाजी गेंदेवाड सरांचं मोठे कौतुक करण्यात आले, 6:30 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, 20 किलोमीटरचा प्रवास करून गेंदेवाड सरांनी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी सकाळीच उपस्थित झाले.आणि आंतरराष्ट्रीय योग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिक्षक प्रेमी व गावातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकाकडून गेंदेवाड सरांचं,कार्याचं  कौतुक करण्यात येत आहे