Ticker

6/recent/ticker-posts

एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा दरोडा टाकणा-या सराईत आरोपींना अवघ्या ८ तासांत पकडून जेरबंद



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 कमी पैशात सोने देतो असा बहाणा करुन जबरदस्तीने मारहाण करुन एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा दरोडा टाकणा-या सराईत आरोपींना पुसेगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी अवघ्या ८ तासांत पकडून जेरबंद केले .

याबाबत अधिक माहिती अशी , प्रविण महादू मेचे वय २३ वर्षे, जात-हिंदू-धनगर, व्यवसाय-चहा हॉटेल, रा. अजमेरा कॉलनी प्लॅट नं. २, दत्तमंदीर शेजारी पिंपरी चिंचवड ता. हवेली जि.पुणे, मूळ रा. वडनेर बुद्रुक ता. पारनेर जि. अहिल्यानगर याचे हिंजवडी पुणे येथे चहाचे हॉटेल आहे.  मार्च २०२५ मध्ये तक्रारदार यांची देवराज अमित शिंदे रा. डिस्कळ ता. खटाव जि. सातारा याचेसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे व्हॉटसअॅप वरुन व फोनवरुन एकमेकांशी बोलत होते. दिनांक ३०/०४/२०२५ रोजी तक्रारदार यांची बहिण प्रतिक्षा हिचे लग्न असल्याने त्यांनी त्यांचे व्हॉटसअॅप वर बहिणीच्या लग्नाचे स्टेटस ठेवले होते ते स्टेटस देवराज अमित शिंदे याने पाहून तक्रारदार यांना फोन केला व तो मला म्हणाला की, माझ्याकडे सोने आहे ते मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी तुला कमी पैशामध्ये देतो असे म्हणाला होता. परंतू तक्रारदार यांचे बहिणीचे लग्नावेळी देवराज शिंदे याने सोने दिले नाही. त्यानंतर देवराज अमित शिंदे याने तक्रारदार यांना फोन करुन तू फक्त १,२०,०००/-रुपये घेऊन माझ्याकडे ये, मी तुला त्या पैशात माझ्याकडील १० तोळे सोने देतो असे म्हणाला. तक्रारदार यास सोने खरेदी करण्याचे असल्याने त्यांनी त्यास होकार दिला. नंतर देवराज याने त्याचे मोबाईल वरुन तक्रारदार यांचे मोबाईल वर डिस्कळ गावचे लोकेशन टाकले व त्यांना डिस्कळ ता. खटाव येथे येण्यास सांगितले. 

दि १९ जून रोजी दुपारी १.३० वाजणेचे सुमारास तक्रारदार व त्यांचा मित्र ऋषीकेश गोविंद भोर हे दोघेजण देवराज अमित शिंदे याच्या घरी डिस्कळ येथे गेल्यानंतर त्याने प्रथम त्याच्या घरातील व नात्यातील लोक त्याची आई शानू अमित शिंदे, आजी शिक्षण लाहूर शिंदे, व इतर नातेवाईक सुषमा सुविचार शिंदे, मीना लाहूर शिंदे, सुमित सुविचार शिंदे सर्व रा. डिस्कळ ता. खटाव जि. सातारा व अनिल ऊर्फ अनिमोल गोगाज्या शिंदे रा. फलटण ता. फलटण जि. सातारा यांची त्यांना ओळख करुन दिली. त्यावेळी तक्रारदार हे देवराज यास म्हणाले की, मी आता १,२०,०००/- रुपये तुला देतो, मला तू १० तोळे सोने देणार होतास ते मला अगोदर दाखव असे म्हणाला त्यावेळी देवराज याने त्यांना त्याच्याजवळचे ५ तोळे सोने दाखविले. त्यावेळी तो खरोखरच कमी किमतीत सोने देईल याबाबत तक्रारदार यांचा विश्वास पटला. त्यानंतर तक्रारदार व त्यांचा मित्र ऋषीकेश गोविंद भोर असे दोघेजण डिस्कळ येथील एटीएम मधून पैसे काढून दुपारी १.३० वाजणेचे सुमारास देवराज शिंदे याच्या घरी जावून घराच्या समोरील असलेल्या खाटेवर बसले असता देवराज याची आजी शिक्षण शिंदे हिने तक्रारदार यास सांगितले की, तू माझ्याकडे पैसे दे म्हणजे माझा नातू देवराज हा तुला १० तोळे सोने देईल असे म्हणाली. त्यावेळी तक्रारदार हे तिला अगोदर मला सोने दया मग मी तुम्हाला पैसे देतो असे म्हणाले व स्वतःचे खिशात ठेवलेले १,२०,०००/- रुपये रक्कम खिशावर हात ठेवून दाखवली. त्याचवेळी देवराज अमित शिंदे , शानू अमित शिंदे , शिक्षण लाहूर शिंदे , सुषमा सुविचार शिंदे , मीना लाहूर शिंदे , सुमित सुविचार शिंदे सर्व रा. डिस्कळ ता. खटाव जि. सातारा , अनिल ऊर्फ अनिमोल गोगाज्या शिंदे रा. फलटण ता. फलटण जि. सातारा व इतर ४ ते ५ अनोळखी मुले यांनी तक्रारदार व त्यांचा मित्र ऋषीकेश गोविंद भोर याला धक्काबुक्की करुन, त्यांना पकडून, खाली पाडून तक्रारदार याच्या खिशातील रोख रक्कम १,२०,०००/- रुपये शिक्षण लाहूर शिंदे हिने खिशात हात घालून जबरदस्तीने हिसकावून काढून घेतले. त्याचवेळी अनिल ऊर्फ अनिमोल गोगाज्या शिंदे याने तक्रारदार यांच्या कानातील दोन सोन्याच्या बाळया जबरदस्तीने हिसकावून तोडून घेतल्या. देवराज अमित शिंदे व शानू अमित शिंदे या दोघांनी तक्रारदार यांचे खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून काढून घेतला. त्याचवेळी तक्रारदार यांचा मित्र ऋषीकेश याच्या खिशातील मोबाईल सुषमा सुविचार शिंदे व मीना लाहूर शिंदे या दोघींनी जबरदस्तीने त्याचे खिशात हात घालून, दरोडा टाकून जबरदस्तीने हिसकावून काढून चोरुन नेला. देवराज अमित शिंदे व तेथे असणारी मुले ही राखाड्या रंगाच्या चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ बी.पी.३८९६ असा नंबर असलेल्या चारचाकी गाडीत बसून व महिला घरासमोरील बाजूस तेथून पळून गेल्या असून वरील सर्व गुन्हेगार हे फासेपारधी समाजातील सराईत गुन्हेगार असून त्यांनी तक्रारदार व त्यांचा मित्र यांना धक्काबुक्की करुन जबरदस्तीने त्यांच्याजवळील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल हँडसेट असा एकूण १,८२,०००/- रुपये किमतीचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला असून नमूद आरोपींनी मालमत्तेचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे. नमूद आरोपींनी दरोडा टाकून चोरुन नेलेला सुमारे १,८२,०००/-रुपये किमतीचा माल व आरोपींनी गुन्हयात वापरलेली सुमारे २,००००/- रुपये किमतीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ बी.पी.३८९६ असा एकूण ३,८२,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल गुन्हयामध्ये हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील सराईत आरोपींचा पुसेगाव पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन मोहिम राबवून कसून शोध घेऊन त्यांना शिताफीने पकडून ८ तासांच्या आत अटक केली आहे. पुसेगाव पोलीसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे भविष्यात घडणा-या दरोडा, जबरी चो-या, घरफोड्या, चो-या यांसारख्या मालमत्तेच्या गंभीर गुन्हयांना पुसेगाव पोलीस ठाणे हददीत तसेच सातारा जिल्हयात आळा बसणार आहे.

 पोलीस अधीक्षक तुषार दोशी , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशालीकडूकर , श्रीमती सोनाली कदम उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव, श्री. अरुण देवकर पो.नि. स्था.गु.शा.सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले, सहाय्यक पोलीस फौजदार सुधाकर भोसले, दीपक बर्गे, चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार योगेश बागल, प्रमोद कदम, महिला पोलीस हवालदार अर्चना जाधव, रेश्मा भोसले, गीतांजली काटकर, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे, द-याबा नरळे, उमेश देशमुख, अमोल जगदाळे, शुभम पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि.विश्वास शिंगाडे, पो.हवा. मंगेश महाडीक, राकेश खांडके, अजित कर्णे, पो.कॉ. स्वप्नील दौंड यांनी  कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे  तुषार दोशी पोलीस अधीक्षक, श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक  व  श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी अभिनंदन केले आहे.