Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवीं त्रिशताब्दी जयंती मिरवणूक धनगरी ढोल झांज पथकाच्या गजरात पार पडली



पत्रकार अभिजित भोईटे ग्रामीण प्रतिनिधी 

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कसबे डिग्रज येथे धनगरी ढोल-झांझपथकाच्या गजरात आणि खास आकर्षण असलेले साऊंड सिस्टीम सोबत मिरवणुका काढण्यात आली. "D" युवाशक्तीच्या वतीने अहिल्यादेवींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी दीपप्रज्वलनानंतर महिलांसाठी 'खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे पारितोषिके देण्यात आली.

तसेच, मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले आणि विविध मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .या मिरवणुका आणि कार्यक्रमांद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याची महती आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.