Ticker

6/recent/ticker-posts

लग्न विवाह सेहोळ्या मध्ये मंगळसुत्र चोरास रंगेहाथ पकडले



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड ) लग्न सोहळ्यात घुसून महिलेचे मंगळसूत्र चोरताना एका चोरट्चास रंगेहाथ पकडण्यात आले. या चोरठ्चास नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.प्राप्त माहितीनुसार, मूर्तिजापूर रस्त्यावरील धाबेकर सभागृह येथे विवाह सोहळा असल्याने २ जून रोजी तेथे नागरिकांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा नागरिकांनी दिला बेदम चोप फायदा घेत चोरटा लग्न सोहळ्यात घुसला आणि संधी साधून एका महिलेचे मंगळसूत्र चोरून तेथून पळ काढला.

महिलेने आरडा ओरड केल्याने नागरिकांनी त्यास पळून जात असताना पकडले व चांगलाच चोप दिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश नेवारे, पोका अविनाश वानखडे हे घटनास्थळी हजर झाले व चोरट्यास ताब्यात घेतले

राज मनोज राजपूत (२०, मध्यप्रदेश असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता