Ticker

6/recent/ticker-posts

कसबे डिग्रज मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव पार पडणार



पत्रकार अभिजित भोईटे @ ग्रामीण प्रतिनिधी कसबेडिग्रज

"D" युवाशक्ती कसबे डिग्रज यांच्यातर्फे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कसबे डिग्रज मध्ये मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 या ऐतिहासिक प्रसंगी ३१ मे रोजी प्रतिमेचे पुजन फुले आणि रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तर १ जुन रोजी पु.अहिल्यादेवी आणि छ.संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रसिद्ध व्याखाते सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान, २ जुन रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि ३ जून रोजी धनगरी ढोल झांज पथक साऊंड सिस्टिम च्या गजरात भव्य मिरवणूक अशा सोहळ्यात त्रिशताब्दी जयंती महोत्सव पार पडणार आहे