Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर महाविद्यालयात करियर कट्टाद्वारे सौर ऊर्जा दिन ऊत्साहात साजरा



देगलूर:- प्रतिनिधी- जावेद अहेमद

अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलुर महाविद्यालय देगलुर येथे सौर ऊर्जा दिनाचे औचित्य साधून सौर ऊर्जा जनजागृती अभियान अन्तर्गत सोलार उर्जेचे महत्त्व व फायदे याविषयावर उद्बोधन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, डॉ एम एम पटेल, डॉ व्ही जी शेरीकर, पर्यवेक्षक संग्राम पाटील उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. 

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने *"करिअर कट्टा"* या उपक्रमांतर्गत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा कॉलेज, विरार यांच्या सहकार्याने ऑनलाईन ‘Solar Energy Awareness Program या विषयावर प्रशिक्षण दैन्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी सौरऊर्जेचे संवर्धन करणे गरजेचे आहे आणि करिअर कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याना दररोज एक आयएएस अधिकारी आपल्या मार्गदर्शन करीत असतात त्याचप्रमाणे एक आंतरराष्ट्रीय स्तराचे एक उद्योजक आपणाला ऑनलाइन मार्गदर्शन करीत असतात.

करिअर कट्ट्याचा जास्तीत जास्त विद्यार्थयानी लाभ घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन केले याप्रसंगी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. बी आर कतूरवार आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भानुदास नरवाडे यांनी सोलार ऊर्जा उपयोग, आर्थिक बचत तसेच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनामध्ये सोलार पॅनलचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले आणि प्रत्येकाने आपल्या घरावर सोलर पॅनल बसउन पर्यावरण संरक्षणाचे मूलभूत कर्तव्य पार पाडावे असे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी मोटार सायकल खरेदी करताना पेट्रोल ऐवजी सौर ऊर्जेवर चालणारी मोटार सायकल खरेदी केली पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केले करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. माधव चोले यांनी सूत्रसंचालन केले तर करिअर कट्ट्याचे सहसवनयक डॉ. सुरेश काशीदे यांनी आभार मानले.