Ticker

6/recent/ticker-posts

धोकादायक इमारतीत चिमुकले गिरवताहेत धडे



(*कवडदरा जिल्हा परिषद शाळात चिमुकल्यांच्या जीवाला धोका*)

अनिल निसरड, ग्रामीण प्रतिनिधी.

२२/०६/२०२५. कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील आदिवासी कवडदरा गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत ही लहान मुलांना बसण्या योग्य नाही. अजीर्ण, धोकादायक असलेली इमारत आणि त्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीचे संपूर्ण छत गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. वर्गात मुलांना बसण्यासाठी थोडी देखील जागा शिल्लक राहिली नाही.काही ठिकाणी इमारतीचा छत कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका आहे असा आरोप ग्रामस्थांनी व पालकांनी केला आहे.

           जिल्हा परिषद कवडदरा शाळेच्या धोकादायक इमारतीत अजूनही चिमुकल्या ,लहान मुलांना धडे गिरवावे लागत आहे,गेली तीन वर्षांपासून त्या इमारतीची अशीच अवस्था आहे, काही एक सुधारणा झाली नाही, अधिकारी मात्र डोळेझाक करीत आहेत असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवायला. धास्तावले आहेत.त्या इमारतीत इयत्ता पहिलीचे २६ विद्यार्थी शिकत आहेत. 

पावसाच्या पाण्यामुळे छत गळती होते, खिडक्या तुटलेल्या,शौचालयाला दरवाजा नाही छत नाही, संरक्षण भिंतीला छिद्रे पडलेले त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाटतो त्यामुळे मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन धोकादायक इमारतीची दुरुस्ती ही लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ रोंगटे, पालक- संतोष रोंगटे,लक्ष्मण डामसे,निवृत्ती मेमाणे,गणेश डगळे,नंदु रोंगटे,संदीप रोंगटे, दिनकर रोंगटे,भिमाबाई कवटे,मंगल रोंगटे,सिता रोंगटे,रंजना रोंगटे... आदींनी केली आहे.