Ticker

6/recent/ticker-posts

चांडोळा बँक अधिकारी यांना बदलीनिमित्त गावकऱ्यांकडून निरोप



●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर 


●आदमपूर:मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कार्यरत शाखा व्यवस्थापक पियुष कुलदीप सातारडे व सहाय्यक शाखा व्यवस्थापक अमोल गोडबोले यांची अनुक्रमे आरमोरी शाखा, जि.गडचिरोली व माळाकोळी शाखा,ता लोहा येथे बँक प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यानिमित्त दोन्ही अधिकाऱ्यांना परिसरातील गावकरी बँक खातेदार व कर्मचारीवर्गाच्या वतीने शनिवार दि.२१ जून रोजी निरोप देत सामुहिक शुभेच्छां देण्यात आल्या आहेत. 

दोन्ही अधिकारी गेल्या अडीच तीन वर्षांपासून चांडोळा येथील शाखेत कार्यरत होते.ग्राहकांना अत्यंत कार्यतत्पर चोख आणि शिस्तबद्ध त्यांची कार्यशैली गावपरिसरातील बँक ग्राहकांना हितकारक ठरली. कर्ज संदर्भात शेतकरी,व्यावसायिक व विविध बचत गट,ठेवीदार पुरूष,महिला बचत गट सदस्य व ग्राहकांना समजून उमजून त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या जागी आंबवली शाखा,जि.रत्नागिरी येथून नुतन शाखा व्यवस्थापक प्रफुल्लकुमार रावजी पुंडगे तर उप शाखाव्यवस्थापक बबलेश खेमराज पाटील हे हाणेगांव,ता.देगलूर शाखेतून चांडोळा शाखेत बदलीपर येत आहेत.

या निरोप समारंभ कार्यक्रमास किरण तमशेट्टे पाटील, कैलास बच्चेवार,शाखाधिकारी पियुष सातारडे,उप शाखाधिकारी अमोल गोडबोले,बँक सहाय्यक महमदरफी मदार,पार्थ बच्चेवार,केरबा गायकवाड,गोपाळ झटकवडे,मदनेश्वर गायकवाड, बालाजी पाटील,संतोष गंगलवाड, नितीन स्वामी,सुधाकर तमशेट्टे,मारोती इबितदार, गफार शेख,उमाजी नाईक,विरभद्र पाटील, राजू स्वामी, राजेंद्र गिरी,सोनू गंगलवाड,राजेंद्र झटकवडे,देविदास बच्चेवार,मारोती झटकवडे,किरण झटकवडे,विशाल कोतवाले व समस्त गावकरी मंडळी यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.